कोल्हापूर - सुदैवाने वाचला, जंगमहट्टी येथील एकावर अस्वलाचा हल्ला | Bear Attack News in Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Bear Attack News in Kolhapur
कोल्हापूर - सुदैवाने वाचला, जंगमहट्टी येथील एकावर अस्वलाचा हल्ला

कोल्हापूर - सुदैवाने वाचला, जंगमहट्टी येथील एकावर अस्वलाचा हल्ला

चंदगड : जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील तानाजी बाबू शेळके (वय 32 ) यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. ते ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सकाळी नळपाणी योजनेचे पाणी सुरु करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. प्रसंगावधान राखत पळत जाऊन ते शेजारच्या झाडावर चढले. त्यामुळे गंभीर दुखापत झाली नाही. (Bear Attack News in Kolhapur)

गावात सायफन पध्दतीने जंगलातून पाणी आणले आहे. तेथील पाणी धनगरवाड्यावर सोडण्याची जबाबदारी तानाजीकडे होती. आज पहाटे तो पाणी सोडण्यासाठी गेला होता. त्याचवेळी अस्वलाने पाठीमागच्या बाजूने त्याच्यावर हल्ला केला. अस्वलाच्या अस्तित्वाची चाहूल लागताच तानाजीने पळत शेजारचे झाड गाठले. पायात गनबुट असल्याने त्याला वर चढता येईना. तेवढ्या वेळात अस्वलाने त्याच्या डाव्या दंडावर पंजा मारला. दरम्यान तानाजीला वर चढण्यात यश आले. बराच वेळ अस्वल त्या परीसरातच होते. जोराने ओरडून त्याने मदत मागितली. त्यानंतर गावातील लोकांनी तिथे जाऊन शेकोटी केली व त्याला झाडावरुन खाली उतरवले. वनपाल दत्ता पाटील व सहकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी त्याची भेट घेतली. चंदगड ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचाक केले.

Web Title: Bear Attack Ontanaji Shelke Jangamhatti Chandgad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapurbear