Belagavi Mayor : बेळगावच्या महापौरपदी मराठी भाषिक मंगेश पवार; उपमहापौरपदी वाणी जोशी, भाजपची महापालिकेतील सत्ता अबाधित
Belagavi News : नगरसेवकपद रद्द झाल्याने अपात्र ठरलेल्या मंगेश पवार यांनाच महापौर करून आमदार पाटील यांनी विरोधकांना चितपट केले आहे. महापौरपदी मराठी भाषिक मंगेश पवार यांची निवड झाली.
Mangesh Pawar takes over as Belagavi Mayor, with Vani Joshi as Deputy Mayor, securing BJP's continued leadership in the municipal corporation.Sakal
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी मंगेश पवार यांची, तर उपमहापौरपदी वाणी जोशी यांची निवड झाली. प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टन्नावर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. १५) झालेल्या महापालिकेच्या बैठकीत ही निवड झाली.