Rain Update : धो धो पाऊस पडताच लाईटीची सुरु झाली बोंबाबोंब; 'हेस्कॉम'कडं 100 हून अधिक तक्रारी

पावसाने (Belgaum Rain) जोरदार हजेरी लावल्याने मंगळवारी अनेकांच्या घरातील वीज पुरवठा खंडित झाला.
Belgaum Rain Update HESCOM
Belgaum Rain Update HESCOM esakal
Summary

रात्रीपासून शहर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने विविध कारणाने अनेकांच्या घरातील वीजपुरवठा खंडित झाला.

बेळगाव : शहर आणि परिसरात पावसाने (Belgaum Rain) जोरदार हजेरी लावल्याने मंगळवारी अनेकांच्या घरातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे हेस्कॉमकडे १०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

त्यामुळे अनेकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी हेस्कॉमतर्फे (Hescom) चार वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून, हेस्कॉमतर्फे ग्राहकांच्या सोयीसाठी संपर्क क्रमांक जाहीर करण्यास आले आहेत. बेळगाव शहर आणि परिसरात हेस्कॉमच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

Belgaum Rain Update HESCOM
Rain Update : कोल्हापुरात पाणलोट क्षेत्रात मुसळधार; 'या' 14 धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ, जिल्ह्यात आज Orange Alert

ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी शहर उपविभाग केंद्रासह वडगाव, शहापूर, गोवावेस, उद्यमबाग, नेहरूनगर व इतर ठिकाणी तक्रार नोंद करण्यासाठी क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, तक्रारी वाढल्यानंतर अनेकदा ग्राहकांचे कॉल स्वीकारले जात नाहीत, त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

सोमवारी रात्रीपासून शहर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने विविध कारणाने अनेकांच्या घरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दिवसभर तक्रार दाखल करण्यासाठी नागरिकांनी हेस्कॉमच्या संपर्क क्रमांकावर तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न केले.

Belgaum Rain Update HESCOM
Koyna Dam Update : मोठा दिलासा! आपत्कालीन परिस्थितीवर मात करत कोयना धरणातून तब्बल 13.536 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती

मात्र, तक्रारी वाढल्याने तक्रार नोंद करुन घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार वाढली आहे. याची दखल घेऊन हेस्कॉमने ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी मागणी होऊ लागली आहे.

Belgaum Rain Update HESCOM
Rain Update : सोलापुरात Non Stop सलग 22 तास धुवांधार; बळीराजा खूश, खरिपाच्या पिकांना मिळणार जीवदान

हेस्कॉमतर्फे जाहीर करण्यात आलेले संपर्क क्रमांक

  • शहापूर, वडगाव - ०८३१-२४८८७००

  • मोबाइल - ९४८०८८२०३५

  • सेक्शन अधिकारी - ९४८०८८१९९४

  • गोवावेस - ०८३१ २४२३८००

  • मोबाइल - ९४८०८८२०३७

  • सेक्शन अधिकारी - ९४८०८८१९९५

  • उद्यमबाग सेक्शन अधिकारी - ९४८०८८२०३३, ९८४४१७१३०५

  • टिळकवाडी - ९४८०८८१९९६

  • बेळगाव उत्तर - ९४८०८८३८१५

  1. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सेक्शन अधिकारी - ९४८०८८१९९७

  2. महांतेशनगर, शाहूनगर, हनुमाननगर व परिसर - ९४८०८८२०१९

  3. गोंधळी गल्ली, खडे बाजार, कॅम्प - सेक्शन अधिकारी ९४८०८८१९९२

  4. गांधीनगर, अलारवाड, बसवन कुडची आणि परिसर सेक्शन अधिकारी ९४८०८८१९९३

Belgaum Rain Update HESCOM
Mumbai Rain Update : पुढील दोन दिवस मुंबईकरांसाठी महत्वाचे; हवामान विभागानं दिला मुसळधार पावसाचा इशारा

पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे मंगळवारी चार वाहन आणि अधिक कर्मचारी लावून तक्रारीचे निवारण केले जात आहे. हेस्कॉमच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात.

विनोद करूर, शहर अभियंता (प्रभारी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com