64 हजारांच्या दारूसाठी 60 लाखांच्या वाहनांवर पाणी...

belgum police action on Alcohol smuggling in khanapur
belgum police action on Alcohol smuggling in khanapur

खानापूर (बेळगाव) - मद्यविक्री बंद असल्याने गोवा बनावट, गावठी आणि काजूच्या दारूची तस्करी जोरात सुरू आहे. गेल्या महिनाभरात तालुक्यात अबकारी आणि पोलिस खात्याने याविरोधात मोहीम उघडली असून 30 दिवसांत 20 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे केवळ 64 हजारांच्या दारूसाठी तस्करांनी 60 लाखांच्या वाहनांवर पाणी सोडले आहे. आतापर्यंत 24 जणांना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली असून दोघेजण फरारी आहेत.

शहर आणि ग्रामांतर भागात सध्या मद्य विक्री पूर्णत: बंद आहे. त्यामुळे तळीरामांच्या घशाला कोरड पडली असल्याने दारू मिळविण्यासाठी अनेकविध तजविज केल्या जात आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या काजूच्या दारूचा हंगाम आहे. तर गोव्यात दारू सहज उलपब्ध होते. काटगाळी, मार्कंडेयनगर परिसरातील मंगोत्री नदीच्या काठावर पारंपारिक दारू गुत्त्यांना भलताच भाव आला आहे. दारू तस्करी आणि विक्रीविरोधात पोलिस आणि अबकारी खात्याने जोरदार मोहीम उघडली असून पश्चिम भाग लक्ष्य बनविण्यात आला आहे. चोर्ला आणि अनमोड या दोन्ही मार्गावरून गोव्याच्या दारूची तस्करी होत आहे. भाजी आणि दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांतून ही तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे.

24 मार्चपासून दोन्ही खात्यांनी दारूची चोरटी विक्री आणि तस्करीविरोधात मोहीम उघडली. गेल्या 30 दिवसांत अबकारी खात्याने सात गुन्हे नोंदविले असून 37 लाख 620 रुपयांचा मुद्देमाल आणि सात जणांना अटक केली. तर पोलिस खात्याने तेरा गुन्हे नोंदवून 23 लाख 24 हजार 12 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 17 जणांना कारागृहात डांबले आहे. दोन्ही खात्याकडून तस्कर आणि दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या जात असल्या तरी दररोज किमान एकतरी गुन्हा दाखल होत आहे. तळीरामांकडून वाढत असलेली मागणी आणि सद्यस्थितीत दारूला मिळत असलेला प्रचंड दर यामुळे हा अवैध प्रकार सुरूच आहे. कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी सकाळला सांगितले.
 

मद्यविक्री बंद असल्याने तस्करी आणि अवैध विक्री वाढली आहे. गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असली तरी वाढत्या मागणीमुळे पूर्णत: आळा घालणे जटील बनले आहे. विशेष म्हणजे खेड्यांत दारू विक्रीच्या काळात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यासाठी गावागावात जाऊन कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
-    महेश परिट, अबकारी निरीक्षक
 

कारवाई अशी...

पोलिस खाते

  • गुन्हे 13/ 17 जणांना अटक
  • गावठी/ काजू दारू  62 लिटर (6200 रुपये)
  • गोवा बनावटीची दारू 21 लिटर (22812 रुपये)

जप्त करण्यात आलेली वाहने

  • दुचाकी वाहने 06 (95 हजार रुपये)
  • चारचाकी वाहने 02 (22 लाख रुपये)

अबकारी खाते

  • गुन्हे सात/ सात जणांना अटक
  • गावठी/काजू 169 लिटर (23 हजार 400 रुपये)
  • गोवा बनावटीची दारू 49 लिटर (12 हजार 220 रुपये)

जप्त केलेली वाहने

  • दुचाकी 03 (65 हजार रुपये)
  • चारचाकी 03 (36 लाख रुपये)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com