esakal | कोल्हापूर - रविवारी कॅन्डल मार्च तर सोमवारी जिल्हा बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat band

बंद शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, बंद कडकडीत आणि शांततेत व्हावा

कोल्हापूर - रविवारी कॅन्डल मार्च तर सोमवारी जिल्हा बंद

sakal_logo
By
- लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांना चिरडून मारण्याच्या निषेधार्थ सोमवारी (11) जिल्हा बंद शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन आज जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच मृत शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या रविवारी रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी पुतळा ते बिंदू चौक कॅन्डल मार्च काढण्याचाही निर्णय मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केला. बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय यांचा समावेश असून अत्यावश्यक सेवा वगळण्यात येत असल्याचेही येथे जाहीर करण्यात आले.

दरम्यान रविवारी रात्री बारापासून सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा बंद असेल, हा बंद शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, बंद कडकडीत आणि शांततेत व्हावा असेही आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.

हेही वाचा: पुढच्या 3 तासात राज्यातील 'या' भागात गडगडाटासह मुसळधार

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारचा बंद यशस्वी करण्यासाठी आज शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. येथे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश शिरसागर, आमदार सर्वश्री चंद्रकांत जाधव, प्रकाश आबिटकर, राजूबाबा आवळे, जयंत आसगावकर, यांच्यासह सर्वपक्षीय जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. बंद शांततेत कडकडीत यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

केंद्र शासनाने केलेले शेतकरी कायदे कसे निषेधार्थ आहेत हे पटवून देण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. लोकशाही देशात हुकुमशाही करून अदानी, अंबानींसाठी शेतकऱ्यांना चिरडले जात आहे, अशा भारतीय जनता पक्षाचा बैठकीत जाहीर निषेध करून विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा: पत्नीचे चारित्र्य अन् अपत्याच्या संशयावरून 'आरव'चा खून

loading image
go to top