
Bhaskar Jadhav : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या स्टेटस मधून त्यांनी पक्ष नेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच वेळ गेल्यानंतर माणसाची किंमत करण्यात काहीच अर्थ नाही असा सल्लाही दिला आहे. त्यांचा दुसरा सल्ला नक्की कोणासाठी आहे हे समजायला मार्ग नाही त्यामुळे त्याची चर्चा सुरू असून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.