Crime News : बिद्रीत दीड लाखाचा गुटखा जप्त; संशयित मजरे कासारवाडातील ः गुन्हे अन्वेषणचा छापा

Gutkha Seized : कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथे गुन्हे अन्वेषण शाखेने टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले
Police seize illegal gutkha stock

Police seize illegal gutkha stock

sakal

Updated on

मुरगूड : बिद्री (ता. कागल) येथे गुटख्याचा साठा करणाऱ्या दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून सुमारे १ लाख ५३ हजार ५५२ रुपयांचा गुटखा जप्त केला. उदय भिकाजी ढेकळे (वय ३९, धंदा किराणा दुकान रा. मजरे कासारवाडा, ता. राधानगरी) याच्यावर मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com