पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडाच्या (Panhalgad) तीन दरवाजातून पश्चिम भागास जोडणाऱ्या रस्त्यावरील संरक्षक भिंतीवरून दुचाकी दरीत कोसळून आशा सचिन कुंभार (वय ३५, रा. वाशी, करवीर, मूळ रा. मणेराजुरी, तासगाव) गंभीर जखमी झाल्या. पन्हाळ्यातील युवकांनी दरीत उतरून जखमी महिलेस झोपाळ्यातून वर काढल्याने त्यांना जीवदान मिळाले. काल सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.