
वाढदिवसाच्या पार्टीत मित्रालाच भोसकले
esakal
Kolhapur Party Violent : वाढदिवसानिमित्त रंगलेल्या ओल्या पार्टीत जवळच्याच मित्रांमध्ये झालेल्या वादातून पोटात चाकू भोसकल्याने अजिंक्य अशोक साळोखे (रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ) जखमी झाला, तर झटापटीत त्याचा भाऊ अक्षय साळोखेही जखमी झाला झाला. याप्रकरणी आकाश संभाजी भोसले (वय ३४, रा. वेताळमाळ तालीम, शिवाजी पेठ) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.