
Bitcoin Fraud
esakal
बिटकॉईन गुंतवणुकीचे आमिष – नीलेश पाटील (२०) या विद्यार्थ्याला संशयितांनी बिटकॉईनमध्ये चांगला परतावा मिळेल असे सांगून आईचे ५ तोळ्याचे सोन्याचे गंठण गहाण ठेवायला प्रवृत्त केले.
रक्कम हडप – गहाण ठेऊन २ लाख रुपये घेतले, त्यापैकी फक्त ६३ हजार नीलेशला दिले आणि उरलेले पैसे तसेच दागिना परत केला नाही.
फसवणुकीचा गुन्हा – या प्रकरणी मिहीर चंद, तन्वेश पवार, अमित सहानी व वासू मेहतर यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
Sangli Police : जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणास आईचे पाच तोळ्याचे गंठण गहाण ठेवण्यास प्रवृत्त करून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत नीलेश गणेश पाटील (वय २०, संजयनगर) याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार संशयित मिहीर चंद (रा. पटेल आर्केड, मिरज), तन्वेश दीपक पवार (रेणुका मंदिरजवळ, वानलेसवाडी), अमित सहानी, वासू मेहतर (पूर्ण नाव, पत्ता नाही) यांच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.