Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती
BJP to Appoint Corporators : कोल्हापूर महापालिकेत नेतृत्वाला चालना देण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक करण्याची घोषणा केली. समाजातील विविध घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर : ‘महापालिकेमध्ये अधिकाधिक जणांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी, समाजातील विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आम्ही सव्वा वर्षाला एक स्वीकृत नगरसेवक करणार आहोत.