पक्षांतर्गत निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, त्यावरही चर्चा झाली. येत्या महिन्याभरात ही प्रक्रिया पार पडणार आहे.
इचलकरंजी : आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Ichalkaranji Municipal Election) स्वबळावर लढविण्याचा निर्णय भाजपच्या इचलकरंजी शहर कोअर कमिटीच्या (BJP Core Committee) बैठकीत घेण्यात आला. महायुतीतील घटक पक्षांसह आणखी कोणाशी आघाडी करायची, याबाबतचा निर्णय त्या - त्यावेळी घेण्यावर एकमत करण्यात आले. यशवंत प्रोसेसर्स येथे माजी आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) व सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.