BJP Nomination Controversy : उमेदवारी यादी जाहीर होण्याआधीच भाजपमध्ये असंतोषाचा स्फोट,निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संयम सुटला; अपक्ष लढतीमुळे गणित बिघडण्याची शक्यता
इचलकरंजी : येथील महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी डावलल्यानंतर इच्छुकांचा आज उद्रेक पहावयास मिळाला. भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू असून त्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. विक्रमनगर भागात तर महिला रस्त्यावर उतरल्या.