
Jayant Patil News : राज्यातील जनता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपसोबत राहील. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी जो जाहीरनामा तयार केला जाईल, तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू. आगामी निवडणुकीत महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले. संजयनगर येथे भाजपच्या वतीने कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन केले होते.