महाडिक आत, तर आबाजी बाहेर; चराटींसह बंद खोलीआड खलबतं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Political Leaders

वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना नेत्यात विधान परिषदेबाबत काय चर्चा होते याबाबत उत्सुकता होती.

महाडिक आत, तर आबाजी बाहेर; चराटींसह बंद खोलीआड खलबतं

आजरा : अण्णाभाऊ संस्था समुहाचे प्रमुख व जिल्हा बॅंकेचे संचालक अशोक चराटी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यात नेत्यांची मांदियाळी आजऱ्यांच्या अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात भरली होती. निमित्त वाढदिवसाचे असले तरी चर्चा मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीची होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना नेत्यात विधान परिषदेबाबत काय चर्चा होते याबाबत उत्सुकता होती. बंद खोलीत झालेल्या चर्चेचा तपशील मात्र उघड झाला नाही.

चराटी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आजऱ्याच्या विकासासाठी ८ कोटींचा निधी दिल्याचे सांगीतले. वाढदिवसाला पालकमंत्री पाटील यांनी शुभेच्छा ही दिल्याचे सांगीतले. पक्षीय सीमा ओलांडून मदत केल्याचाही उल्लेख चराटी यांनी करताच अनेकांनी भूवया उंचावल्या. मी भाजपचाच आहे. पण तालुका व आजरा शहराच्या विकासासाठी मी सर्व पक्षीय सहकार्य नेहमीच घेत आलो आहे, असे सांगीतले. जिल्हा बॅंकेच्या निवडणूकाचा संदर्भ देत ते म्हणाले, सध्या जिल्हा बॅंकेसाठी मी आणि राष्ट्रवादीचे जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी एकत्र आलोत. शिंपी महाविकास आघाडीचे घटक आहेत. त्याच प्रमाणे व्यासपीठावरील आमदार प्रकाश आबिटकर महाविकास आघाडीचे घटक आहेत. या दोन नेत्यांच्या बळावर माझ्याकडे सध्या ६३ ठराव असल्याचे सांगीतले.

हेही वाचा: 'पुरंदरे यांचे जाणे ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी' - नारायण राणे

समरजीतसिंह, धनंजय महाडिकही भेटीला

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी नगरसेवक जयंत पाटील यांनी श्री. चराटी यांची भेट घेतली. त्यांची सुमारे पाऊण तास बंद खोलीत चर्चा सुरू होती. दरम्यान गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, शशिकांत पाटील यांनी चराटी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. मात्र या दोनही गटाच्या नेत्यांची नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. मात्र आजऱ्याच्या नगरपंचायतीत चराटी यांच्याकडे १२ नगरसेवक मतदार असल्याने गळ घातली गेल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

महाडिक आत, तर आबाजी बाहेर

चराटी यांची धनंजय महाडिक यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांची बंद खोलीत चर्चा सुरु होती. या दरम्यान गोकुळचे अध्यक्ष पाटील, संचालक डोंगळे व शशिंकात पाटील चुयेकर बाहेर दालनात बसले होते. त्यामुळे दोघांचीही गोची झाल्याचे जाणवले.

हेही वाचा: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आघाडीसाठी जागा नाही ; उदय सामंत

loading image
go to top