'पुरंदरे यांचे जाणे ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी' - नारायण राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'पुरंदरे यांचे जाणे ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी' - नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही सोशल मिडीयातून श्रद्धांजली वाहिली आहे.

'पुरंदरे यांचे जाणे ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी' - नारायण राणे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर आज राज्यावर शोककळा पसरली आहे. बाबासाहेबांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहन्यात येते आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही सोशल मिडियाद्वारे भावनिक पोस्ट करत दु:ख व्यक्त केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही सोशल मिडीयातून श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन; 10.30 वाजता अंत्यसंस्कार

ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे ही अवघ्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. बाबासाहेबांना माझी विनम्र श्रद्धांजली. अशी एक भावनिक पोस्ट त्यांनी ट्विट केली आहे. दरम्यान, राजकीयसह अन्य अनेक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. खासदार उदयनराजे भोसले, मंत्री नितीन गडकरी यांनीही सोशल मिडीयाद्वारे दु:ख व्यक्त केले आहे.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर आज राज्यावर शोककळा पसरली आहे. बाबासाहेबांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहन्यात येते आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेबांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर वृद्धापकाळानं त्यांचे निधन झाले आहे.त्यांचं जाणं साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाला चटका लावून गेलं आहे.

loading image
go to top