

BJP Calls for Mahayuti Coordination
sakal
कोल्हापूर : ‘महापालिका निवडणूक आपण शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासह महायुती म्हणूनच लढवायची आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांबरोबर समन्वय ठेवून निवडणुकीला सामोरे जा. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना प्रचारात सक्रिय करा’, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली.