esakal | पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेचे आणखी किती बळी? नरबळीच्या घटना चिंता वाढविणाऱ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेचे आणखी किती बळी?

मंगळवारी असाच आणखी एक प्रकार समोर आला असून यामध्येही नरबळीचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेचे आणखी किती बळी?

sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर - गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात नरबळीसह लहान मुलांच्या खूनाच्या घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी असाच आणखी एक प्रकार समोर आला असून यामध्येही नरबळीचा संशय व्यक्त केला जात आहे. यात होत असलेली वाढ ही चिंता वाढवणारी आहे. पुरोगामी कोल्हापुरात अशा अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांचं प्रमाण विचार करायला लावणारं आहे.

शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथील एक चिमुकला याच अंधश्रद्धेवमुळे जीवाला मुकला आहे. नरबळीपायी त्याचा जीव गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सात वर्षाच्या बालकाचे काही अज्ञातांनी रविवारी अपहरण केले होते. आज सकाळी सहा वाजता त्याचा मृतदेह त्याच्याच घराच्या पाठीमागे सापडला. त्याच्या अंगावर गुलाल, हळदी- कुंकू टाकण्यात आलं होतं. त्यामुळे परिसरात नरबळीसाठी जीव झाला असल्याची चर्चा सुरु होती. या घटनेचा तपास शाहूवाडी पोलिस करत आहेत.

हेही वाचा: कोल्हापूर - वारणा कापशीमधून बालकाचे अपहरण

दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. याआधीही कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील या सात वर्षीय बालकाचा असाच अंधश्रद्धेतून नरबळीसाठी खून झाल्याचे आज उघड झाले होते. त्याच्या आजोळी सावर्डे बुद्रुक येथे त्याचा मृतदेह सापडला होता. वरदच्या वडिलांचा मित्रच या घटनेचा मुख्य सुत्रधार होता. आरोपी दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य याने स्वत:ला मुलं होत नाही म्हणून आपल्या मित्राच्या मुलाचा बळी दिला होता. सावर्डेतील लक्ष्मीनगर शेजारील शेतवडीत वरदचा मृतदेह आढळला होता. दरम्यान, घरासमोर खेळत असणाऱ्या वरदला उशिरापर्यंत घरी आला नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. मात्र त्याचा काहीच पत्ता लागला नाही. यानंतर त्याचा मृतदेह तलावात सापडला. त्याच्या शरीरावर काही ठिकाणी व्रण होते. दरम्यान, हा त्याचा जीव नरबळीतून घेतला गेला असल्याचे आरोपी कबुल केले.

अंधश्रद्धेला खतापाणी घालणाऱ्या अशा अनेक घटना हल्ली समोर येत आहेत. सांगली, सातारा जिल्ह्यातील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात लागोपाठ अशा दोन घटना घडणं हे विचार करायला लावणार आहे. लहान मुलांचा बळी देऊन अशी जीवनातील समस्या दूर होत असतील तर मग वैद्यकीय शास्त्र इतक पुढे गेलं असतं का? भोंदू बाबा, मांत्रिक, तांत्रिक यांच्याकडून समस्येवर उत्तर शोधल जात नाही, हे लोकांना कधी समजणार हाच सवाल या घटनांवरुन उपस्थित होत आहे.

हेही वाचा: कोल्हापूर पुन्हा हादरलं! कागलनंतर कापशीत 7 वर्षीय मुलाचा नरबळी

नरबळी बाबत कायदा काय सांगतो -

‘‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश २०१३ (अनुसूची कलम २(१)ख)’’ -

कायद्यानुसार यावर आहे बंदी

- भूत भानामतीवरील विश्वासातून बळजबरीने अघोरी उपाय योजणे

- तथाकथित चमत्कारातून आर्थिक प्राप्ती, फसवणूक व दहशत पसरविणे

- अलौकिक शक्तीच्या हव्यासापोटी अघोरी प्रथांचा अवलंब करणे व त्याचे उदात्तीकरण करणे

- करणी, भानामती, जादूटोण्याची भीती दाखवून अमानुष कृत्य करणे व नरबळी देण

नरबळी म्हणजे काय ?

कोणीतरी कधीतरी जमिनीत धन पुरून ठेवलं आहे, असं मानून ते गुप्तधन मिळवून श्रीमंत होण्यासाठी गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय असतात. नरबळी म्हणजे मनुष्यप्राण्याचा बळी दिला, तर गुप्तधन हमखास सापडतं, अशीही एक अंधश्रद्धा अशा लोकांमध्ये असते. मग त्यासाठीच बळी देण्यासाठी नर शोधायचा आणि मग त्याचा जीव घेऊन धन हुडकायचे, असे प्रकार होत राहतात. ते करणाऱ्यांना धन तर सापडत नाहीच, पण कुणाच्या तरी घरचं पुत्रधन मात्र हे नरपशू कायमचे नष्ट करून टाकतात.

हेही वाचा: कोकणच्या राजकारणात नव्या राष्ट्रीय पक्षाची एंट्री

loading image
go to top