कोल्हापूर पुन्हा हादरलं! कागलनंतर कापशीत 7 वर्षीय मुलाचा नरबळी

कोल्हापूर पुन्हा हादरलं! कागलनंतर कापशीत 7 वर्षीय मुलाचा नरबळी
Summary

आज सकाळी सहा वाजता आरवचा मृतदेह त्याच्या घराच्या पाठीमागे सापडला.

शाहूवाडी : वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील आरव केदार केसरे (५) याचा मृतदेह आज पहाटे त्याच्या घराजवळ आढळला. मृतदेहावर गुलाल, कुंकू टाकले होते. डोक्याला, पाठीवर जखमा होत्या. त्यामूळे हा प्रकार नरबळी असल्याची चर्चा होती. जवळच्या नातेवाईकानेच हे कृत्य केले असावे, असा संशयही व्यक्त होत होता. या घटनेमुळे गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

कोल्हापूर पुन्हा हादरलं! कागलनंतर कापशीत 7 वर्षीय मुलाचा नरबळी
कोल्हापूर - वारणा कापशीमधून बालकाचे अपहरण

घडलेली घटना अशी, (रविवारी ३) तारखेला आरव सायंकाळी घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला. त्याबाबतची तक्रार वडील केसरे यांनी पोलिसांत दिली. त्यानंतर गेली दोन दिवस पोलिस व ग्रामस्थांनी गावाजवळच्या ओढ्या, नाल्यासह, विहिरी असा संपूर्ण परिसर पिंजून काढत अरवचा शोध घेतला. मात्र कुठेही त्याचा पत्ता लागला नसताना, आज पहाटे त्याचा मृतदेह घराजवळ आढळला. या प्रकाराने गाव परिसरात खळबळ उडाली. मृतदेहावर गुलाल, कुंकू टाकले होते. डोक्याला व पाठीवर जखमा होत्या. दरम्यान अरवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय कोल्हापूर येथे पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होईल.

घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे, विभागीय पोलिस अधिकारी साळुंके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या आहेत. गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. या घटनेचा ग्रामस्थांनी निषेध केला.

कोल्हापूर पुन्हा हादरलं! कागलनंतर कापशीत 7 वर्षीय मुलाचा नरबळी
खळबळजनक! म्हाप्रळ खाडीत दिसले सशस्त्र अतिरेकी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com