चैत्र यात्रेत अन्न व औषध प्रशासनाने केवळ यात्रा काळात काही दुकानदारांवर कारवाई केली. पुढे मात्र जैसे थे परिस्थिती आहे.
जोतिबा डोंगर : येथे मेवा मिठाईच्या दुकानात खव्याच्या बर्फीत (Khava Barfi) चक्क ब्लेडचे पान आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चैत्र यात्रेत (Jyotiba Dongar) दोन टन खराब पेढे खवा सापडला होता. त्यानंतर आज ब्लेड सापडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.