Mahadev Temple Kagal : कोल्हापुरात पोर्णिमेच्या रात्री महादेव मंदिरातील पिंडीवर रक्ताची धार, अघोरी प्रकाराचा कळस, ग्रामस्थांकडून तीव्र निषेध

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील संगमेश्वर महादेव मंदिरात पिंडीवर रक्ताची धार आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Mahadev Temple Kagal nanibai chikhali

Mahadev Temple Kagal nanibai chikhali

esakal

Updated on

Sangameshwar Temple Incident : (रमजान कराडे) : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याच्या नानीबाई चिखली येथील कुरली बंधाऱ्यानजीक पुरातन असे संगमेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिरात असलेल्या पिंडीवर अज्ञात व्यक्तीकडून रक्ताची धार सोडण्यात आली आहे. आज (ता.३१)सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पौर्णिमेच्या रात्री घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह मुरगुडचे पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com