
जयसिंगपूर : शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, सहावीच्या अकरा वर्षांच्या विद्यार्थ्यावर पाच-सहा कुत्र्यांनी हल्ला करून पायाचा चावा घेतला. जखम खोलवर झाल्याने त्याला जखमेत इंजेक्शन द्यावे लागले. दरम्यान, शहरात भटक्या आणि हिंस्त्र कुत्र्यांमुळे नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांना धोका असल्याचे वृत्त शनिवारी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध करून प्रशासनाला याचे गांभीर्य दाखवून देण्यात आले होते.