
कोल्हापूर : रंकाळा तलावात कठड्यावरून स्वप्नील कदम याने पाण्यात उडी घेतली. हा प्रकार परिसरात क्रेन ड्युटीवर आलेल्या वाहतूक पोलिस इंद्रजित काशीद यांना समजला. क्षणाचाही विलंब न करता ‘वर्दीसह’ पाण्यात उडी घेत त्यांनी संबंधित तरुणाला बाहेर काढले. त्यांच्यासह क्रेनवरील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.