esakal | 'कोपा' अमेरिका फुटबॉल स्पर्धा; शिवाजीपेठेत जल्लोष तर मंगळवार पेठेत सन्नाटा
sakal

बोलून बातमी शोधा

'कोपा' अमेरिका फुटबॉल स्पर्धा; शिवाजीपेठेत जल्लोष तर मंगळवार पेठेत सन्नाटा

'कोपा' अमेरिका फुटबॉल स्पर्धा; शिवाजीपेठेत जल्लोष तर मंगळवार पेठेत सन्नाटा

sakal_logo
By
सुयोग घाटगे

कोल्हापूर : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना संघाने विजय मिळवताच शहरातील शिवाजीपेठ येथे जल्लोष झाला, तर ब्राझीलच्या पराभवाने मंगळवार पेठ सुन्न झाली. जागतिक फुटबॉलमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या अर्जेंटिना आणि ब्राझील हे संघ 'कोपा' चषकासाठी सकाळी साडेपाच वाजता भिडले. तर कोल्हापूरच्या फुटबॉलच्या आजवरच्या इतिहासातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे शिवाजी पेठ विरुद्ध मंगळवार पेठ हे समीकरण आजही पहायला मिळाले. अर्जेंटिना संघाने विजय मिळवताच शिवाजी पेठेमध्ये कोपा अमेरिका चषकाच्या प्रतिकृतीसह एकच जल्लोष झाला. तर ब्राझील संघ हरल्याने मंगळवार पेठेतील चाहत्यांची मात्र निराशा झाली.

हेही वाचा: MPSC च्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंची राज्य सरकारला विनंती

संपूर्ण जगभरातील फुटबॉल प्रेमींचे लक्ष लागून राहिलेले कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीनाने ब्राझीलला १ - ० ने नमवत विजेतेपद पटकावले. १९९३ नंतर प्रथमच विजेतेपद पटकावणाऱ्या अर्जेंटिनाने सर्वच स्थरावर उत्कृष्ट खेळ केला. अँजेल डी मारियाच्या एकमेव गोल सामन्यात निर्णायक ठरला. रिओ-डी-जनेरिओ मधील माराकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अर्जेंटिना आणि नेमारचा ब्राझील संघ हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत दाखल झाले होते. त्यामुळे या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले होते.

loading image