Kolhapur : कारवाईतून नाव वगळतो, १५ लाख द्या; गुटखा व्यापाऱ्याकडे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

कर्नाटकातील गुटखा व्यापाऱ्याकडून १५ लाख रुपये घेण्यासाठी मध्यस्थावर वारंवार दबाव टाकणाऱ्या मंगेश लवटे याच्याविरोधात गुन्हा दाखल.
crime

crime

sakal

Updated on

कोल्हापूर - कर्नाटकातील गुटखा व्यापाऱ्याकडून १५ लाख रुपये घेण्यासाठी मध्यस्थावर वारंवार दबाव टाकणाऱ्या तत्कालीन अन्न औषध प्रशासन अधिकारी मंगेश मल्हार लवटे याच्याविरोधात आज येथे गुन्हा दाखल झाला. लवटे सोलापूर येथे कार्यरत आहे.

याबाबत वसीम खुदबुद्दीन शेख (वय-४२, रा. जयसिंगपूर) यांनी उपलोकायुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात लवटेविरोधात गुन्हा नोंद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com