'पैसे परत मागितले तर तुला व तुझ्या नवऱ्याला जिवंत ठेवणार नाही'; बहिणीला सख्ख्या भावाकडून बेदम मारहाण

Crime News : संशयित श्रीनाथ पाटील हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. त्याची नोकरी लागेपर्यंत व्यवसाय सुरू करण्यासाठी बहिणीकडून त्याने वेळोवेळी पैसे घेतले होते.
Crime News
Crime Newsesakal
Updated on
Summary

चिडलेल्या श्रीनाथ पाटील याने दीपाली यांना शिवीगाळ, मारहाण केली. ‘पैसे परत मागितले तर तुला व तुझ्या नवऱ्याला जिवंत ठेवणार नाही,’ असे धमकावले.

कोल्हापूर : व्यवसायासाठी भावाला दिलेली २६ लाखांची रक्कम परत मागितल्याच्या रागातून दीपाली अरविंद पाटील (वय ३५, भायखळा, मुंबई) यांना सख्ख्या भावाकडून मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचा ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून पळाल्याप्रकरणी फिर्यादीचा भाऊ श्रीनाथ अरविंद पाटील (वय २८, ब्रह्मपुरी, कागल) याला पोलिसांनी (Police) अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com