
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सख्ख्या भावावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली
esakal
Gadhinglaj Kolhapur Crime : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे शेतजमिनीच्या वादातून आज एकाने छऱ्याच्या बंदुकीतून सख्ख्या थोरल्या भावावर गोळीबार केला. त्यात सुरेश कलाप्पा हेब्बाळे जखमी झाले. त्यांच्या घराजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी त्यांचा लहान भाऊ व संशयित चंद्रकांत कलाप्पा हेब्बाळे याच्याविरोधात पोलिसांनी गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.