इमारत एक कार्यालये अनेक; महापालिकेला  नव्या इमारतीची गरज 

 Building one several offices; Municipal Corporation needs a new building
Building one several offices; Municipal Corporation needs a new building
Updated on

कोल्हापूर  : महापालिकेच्या हद्दीत सगळ्या शासकीय कार्यालयांच्या सुसज्य इमारती आहेत; पण महापालिकेची इमारत मात्र जुनी, विविध मार्केटच्या विळख्यात सापडली आहे. जुन्या इमारतीत अनेक कार्यालये, केबिन्स, सभागृह आदी विभाग आहेत. त्यामुळे इमारत एक आणि कार्यालयेच अनेक अशी अवस्था सध्या झाली आहे. अपुऱ्या इमारतीत महापालिकेचा श्‍वास कोंडला आहे. इमारतीतील व्हरांड्यांतही काही कार्यालये थाटली आहेत. 
महापालिकेला नव्या इमारतीची गरज आहे; पण त्यादुष्टीने प्रयत्न केले जात नाहीत. जन्म, मृत्यूच्या दाखल्यापासून ते व्यवसाय परवाना, बांधकाम परवाना, पाणीपुरवठ्यासह सर्वच महत्त्वाची कामे करण्याची आणि त्याला परवाने देण्याची कामे महापालिकेकडून होतात. साहजिकच या कार्यालयात अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, कर्मचारी यांची मोठी वर्दळ असते. 
नव्या इमारतीसाठी मैलखड्डा येथील जागेचा विचार सुरू असला तरी नागाळा मंदिरालगतच्या जुन्या इस्तेर पॅटर्न विद्यालयाची व सध्याच्या विजयमाला घाटगे विद्यालयाची जागाही मोठी आहे. मुख्य इमारतीत दररोज यावे लागणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेत पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवकांच्या वाहनांनाही पार्किंग मिळत नाही, अशी स्थिती आहे. 

जुन्या इमारतीत ही आहेत कार्यालये 
मुख्य इमारत सध्या शहराच्या गजबजलेल्या बाजारगेट परिसरात आहे. ही इमारत हेरिटेज आहे. दोन मजली असणाऱ्या या इमारतीत शाहू सभागृह, ताराराणी सभागृह अशी दोन लहान सभागृहे आहेत. महापौर, उपमहापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांची केबिन्स, पक्षांची कार्यालये, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची केबिन्स, नगरसचिव विभाग, शहर अभियंता (सार्वजनिक बांधकाम कार्यालय) , जन्म मृत्य नोंद विभाग, रेकॉर्ड ऑफिस, मुख्य लेखापाल कार्यालय, अग्निशमन दल, नागरी सुविधा केंद्र ही कार्यालये आहेत. 

मैल खड्डा जागेचा विचार पण... 
शहराच्या हद्दीत जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस मुख्यालय, न्यायालय, जात पडताळणी विभाग आदी महत्वाच्या कार्यालयांना प्रशस्त इमारती आहेत. त्या तुलनेत महापालिका मात्र मागे पडली आहे. महापालिकेला प्रशस्त जागाही नाही आणि इमारतही नाही, अशी स्थिती आहे. महापालिकेच्या अनेक जागा आहेत. पण महापालिकेच्या मुख्य इमारतीसाठी शहराच्या मध्यवर्ती अशी एखादी जागा अद्याप निश्‍चित केली नाही. मैलखड्ड्याच्या जागेचा विचार सध्या सुरू असला तरी ही जागाही शहराच्या एका टोकाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद याप्रमाणेच महापालिकेचे मुख्य कार्यालयही मध्यवर्ती ठिकाणी असायला हवे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com