

Kolhapur Shocking Incident
esakal
Crime Shocking Incident kolhapur : मुलीच्या हळदी समारंभासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी सात लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने, हिऱ्याचे दोन हार, रोख २५ हजार असा ऐवज चोरीस गेल्याची फिर्याद रवींद्र नारायण कदम (वय ६४, रा. मंगळवार पेठ) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. सोमवारी सायंकाळी सहा ते रात्री दहाच्या दरम्यान ही चोरी झाली.