
गौरव डोंगरे
कोल्हापूर : अवैध धंद्यांच्या जोरावर स्वतःला ‘राजा’ समजणाऱ्यांच्या छायेत अनेकजण वाढले. ‘दोन नंबर’चा पैसा मुरवण्यासाठी वेगवेगळे मार्ग काढले. यातच काहींनी भागात सामाजिक कार्य सुरू केले. जिल्ह्याच्या राजकारणात आपले वजन असल्याचा खटाटोप करत ‘व्हाईट’ शर्ट घालून लुडबूड सुरू झाली. पूर्वी ज्या भागात दहशतीच्या बळावर आपले बस्तान मांडले त्याच भागात आता लोकांसमोर हात जोडून मते मागण्यासाठी ‘इच्छुकांची’ फौज बाहेर पडू लागली आहे. आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीचे डोहाळे लागलेल्यांना मतदार त्यांची योग्य जागा दाखवतील, अशी आशा आहे.