विषयचं हार्ड! 'त्या' काळात कोल्हापुरात व्हायच्या उंटांच्याही झुंजी, संशोधनातून माहिती समोर; कबुतरांसह बैल, म्हशींचा नाद मात्र कायम

जिंदादिली आणि लढाऊ बाण्याच्या कोल्हापूरकरांनी (Kolhapur) पहिल्यापासूनच जे काही नाद जपले ते अगदी अफलातून.
Camel Fights in Kolhapur
Camel Fights in Kolhapuresakal
Summary

अमेरिकेतील ‘हेंडर्सन डेली डिस्पॅच’ नावाच्या वृत्तपत्रात ३० मे १९३८ रोजी एक स्कॉटस् स्क्रॅप बुक नावाने एक स्टोरी प्रसिद्ध झाली आहे.

कोल्हापूर : जिंदादिली आणि लढाऊ बाण्याच्या कोल्हापूरकरांनी (Kolhapur) पहिल्यापासूनच जे काही नाद जपले ते अगदी अफलातून. कबुतरं, बैलं, घोडे किंवा म्हशींच्या शर्यती बदलत्या काळात अजूनही होतात. डॉग शोचा ट्रेंडही वाढत आहे. कोंबड्यांच्या, बैलांच्या, रेड्यांच्या, हत्तींच्या झुंजीवर सध्या बंदी असली तरी स्वातंत्र्यपूर्व काळात शहरात अशा झुंजींबरोबरच उंटांच्याही झुंजी व्हायच्या, अशी नवी माहिती नुकतीच पुढे आली आहे.

Camel Fights in Kolhapur
कधीकाळी चक्क 'या' अभिनेत्यानं देवालाही घातलेल्या शिव्या, माझ्याच वाट्याला का हे दुःख म्हणून झालेला उद्विग्न!

असा लागला शोध...

येथील संग्राहक यशोधन जोशी आणि भारत महारुगडे यांना काही महत्त्‍वाची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यातून कोल्हापुरात उंटांच्या गाड्या होत्या आणि उंटांच्या झुंजीही व्हायच्या, याबाबतची छायाचित्रे व माहितीपत्रके उपलब्ध झाली आहेत. अमेरिकन चर्च मिशनचे रिपोर्ट बघताना १९११ मध्ये एस्तेर पॅटर्न यांनी काढलेले एक छायाचित्र त्यांना मिळाले. त्यात खाली ‘कॅमल कार्ट ऑफ कोल्हापूर स्टेट’ असे म्हटले असून, गाडीत पॅसेंजरही दिसतात.

Camel Fights in Kolhapur
जैन, बौद्ध, हिंदू अशा तिन्ही धर्माच्या मूर्ती 'या' मंदिरात दिसतात; कोणतं आहे मंदिर आणि इथं कसं जाल?

अमेरिकेतील ‘हेंडर्सन डेली डिस्पॅच’ नावाच्या वृत्तपत्रात ३० मे १९३८ रोजी एक स्कॉटस् स्क्रॅप बुक नावाने एक स्टोरी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये कोल्हापुरात उंटांच्या झुंजी होतात आणि त्या खूप लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्या झुंजी नेमक्या कुठे व्हायच्या, याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नसली तरी त्यादृष्टीनेही पुढील संशोधन सुरू असल्याचे श्री. जोशी व श्री. महारुगडे सांगतात.

Camel Fights in Kolhapur
Sahyadri Forest Journey : 'शरीर आणि मन हलकं करणारा रानगंध'

नाद पटसोंगट्यांचाही...

शहराच्या जुन्या पेठांत चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी पटसोंगट्यांचा खेळ रंगायचा. प्रत्येक तालमीत रात्री पटसोंगट्यांचा पट आणि त्याच्याभोवती जमलेले पंधरा-वीस जण असे चित्र आवर्जून दिसायचे. अगदी पहाटेपर्यंत हा खेळ रंगायचा. पण, पैसे लावून खेळण्यावर निर्बंध होते. बदलत्या काळात हा खेळ विस्मृतीत गेला. पण, सात-आठ वर्षांपूर्वी उत्तरेश्‍वर पेठेतील वाघाची तालमीने पुन्हा नवे संघ तयार करून या खेळाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला होता. राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त दोन वर्षांपूर्वी काही मंडळांनी पटसोंगट्या स्पर्धा घेतल्या होत्या. अजूनही विविध उत्सवांच्या निमित्ताने हा नाद जपला जातो आहे. मात्र, त्याचे प्रमाण तुलनेत कमी झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com