
Kolhapur CPR Hospital : सीपीआरमधील हृदयशस्त्रक्रिया विभागात कार्डिओलॉजिस्ट डॉ. अक्षय बाफना व त्यांच्या वैद्यकीय पथकाने चार वर्षीय मुलगी तसेच १३ वर्षीय मुलावर विनाछेद हृदयशस्त्रक्रिया नुकत्याच यशस्वी केल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बालकांना हृदयरोगमुक्त केले. या शस्त्रक्रिया मोफत झाल्या आहेत.