संशयित दीपक पाटील व युवराज पाटील एकमेकांचे नातेवाईक असून, त्यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने अनेकजण तक्रार देण्यास धजावले नव्हते.
कोल्हापूर : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये (Forex Trading Investment) गुंतवणुकीवर दरमहा सहा टक्के परताव्याचे आमिष दाखवून २६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) माजी उपाध्यक्षांच्या मुलासह तिघांवर गुन्हा दाखल झाला. दीपक सर्जेराव पाटील (रा. कळे, ता. पन्हाळा), युवराज सदाशिव पाटील (रा. कोलोली, ता. पन्हाळा) आणि अविनाश मारुती राठोड (सध्या रा. शाहूपुरी, मूळ रा. परभणी) अशी संशयितांची नावे आहेत. खानविलकर पंपाजवळील इमारतीतील ‘पर्ल टी. एम. ग्रुप’ नावाने काढलेली कंपनी बंद करून संशयित पसार झाले आहेत.