Agriculture Cashew Production : हवामान बदलाचा काजूवर परिणाम, ४० टक्के उत्पादन घटणार; चंदगड, कोकणातील शेतकरी अडचणीत, दरात वाढ होण्याची शक्यता

Konkan cashew farmers crisis : हवामान बदलाचा काजू पिकावर मोठा परिणाम झाला असून कोकण आणि चंदगड भागात सुमारे ४० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
Cashew Production drop

Cashew Production drop

esakal

Updated on

Chandgad agriculture news : (रणजित कालेकर) : काजू पिकाला यंदा पोषक हवामान दिसत नाही. हवामानातील बदलामुळे काजू पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे उत्पादनात सुमारे ४० टक्केहून अधिक घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काजूचा हंगाम सुरू होउन दोन महिने लोटले तरी बाजारात म्हणावी तशी काजूची आवक झालेली दिसत नाही. आदीच शेतकऱ्यांसमोर विविध संकटे असताना आणखी एक संकट उभे टाकले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाकडे काजू पिकाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com