cause notice to Kolhapur K P C hospital
cause notice to Kolhapur K P C hospital

कोल्हापुरातील के. पी. सी. रूग्णालयाला कारणे दाखवा नोटीस 

Published on

कोल्हापूर - महाराणा प्रताप चौक येथील के. पी. सी हॉस्पीटलला महापालिकेने आज कारणे दाखवा नोटीस काढली आहे. कोव्हीड- 19 रुग्णांची बिले लेखाधिकारी यांच्याकडून तपासून न घेता परस्पर भरुन घेऊन नंतर तपासणीसाठी सादर केलेबद्दल आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ही नोटीस बजावली आहे. दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेशही दिले आहेत. 

शहरातील खाजगी रुग्णालयासाठी कोव्हीड-19 रुग्णांच्या बिलाचे दर शासनाने नियंत्रीत केलेले आहेत. कोव्हीड-19 रुग्णांची बिले रुग्णांना डिस्चार्ज देणेपूर्वी नियुक्त केलेल्या लेखाधिकाऱ्यांकडून तपासणी करूनच रुग्णांकडून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. परंतू के. पी. सी हॉस्पीटलने कोव्हीड रुग्णांची बिलाची देयके महापालिकेचे लेखाधिकारी मिलींद पाटील यांच्याकडून रुग्णांना डिस्चार्ज देणेपूर्वी तपासून न घेता डिसचार्ज दिल्यानंतर व रुग्णांकडून रक्कम स्वीकारल्यानंतर तपासणीसाठी सादर केली जात होती. तसेच पीपीई किट आणि मास्क यांची जादा दराने आकारणी केली जात असलेचे निदर्शनास आले आहे. याबाबत वेळोवेळी के. पी. सी हॉस्पीटलला लेखाधिकारी यांनी निर्देश दिलेले होते. यामध्ये त्यांनी कोणतीही सुधारणा न केल्याने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज कायद्यातील तरतुदी नुसार कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा दोन दिवसात करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

  शहरातील खाजगी हॉस्पीटलधारकांनी शासनाने निश्‍चीत केलेल्या दरानुसार बिल आकारणी करावी. रुग्णांना डिसचार्ज देणेपूर्वी बिल लेखाधिकारी मार्फत तपासणी करून घ्यावी. अन्यथा संबधीत हॉस्पीटलवर कारवाई करण्यात येईल. तसेच शहरातील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी कोव्हीड रुग्णांची बिल भरण्यापूर्वी ती लेखाधिकारी यांच्याकडून तपासून न घेता संबधीत हॉस्पीटलने भरण्यासाठी तगादा लावल्यास महापालिकेच्या वॉर रुममध्ये संपर्क साधावा, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com