Kolhapur Murder Case : 'कबनूर खुनी हल्‍ला; दानोळीच्या एकाला अटक', पाठलाग करत पकडले, झटापटीत तीन पोलिस कर्मचारी जखमी

CBNUR Murder Attack : सुकुमार बरगाले, बाळकृष्ण सूर्यवंशी व सद्दाम सनदी अशी जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, अटक केलेल्या शिंदे याला आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Kabnur murder attack in Kolhapur
Kabnur murder attack in Kolhapuresakal
Updated on

इचलकरंजी : कबनूर (ता.हातकणंगले) येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव पुजारी खुनी हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयित विजय ऊर्फ बंडा सर्जेराव शिंदे (वय ४२, रा. शिंदे गल्ली, दानोळी, ता. शिरोळ) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. फिल्मीस्टाईलने पाठलाग करत त्याला ताब्यात घेताना झालेल्या झटापटीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी जखमी अवस्थेत असतानाही त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com