सीबीएसईच्या अभ्यासक्रमात बदल; असेसमेंट फ्रेमवर्क पध्दत येणार अंमलात

सहावी ते दहावीसाठी दैनंदिन जीवनातील प्रश्‍नांना महत्त्व
सीबीएसईच्या अभ्यासक्रमात बदल; असेसमेंट फ्रेमवर्क पध्दत येणार अंमलात

शिरोली पुलाची : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता (CBSC) सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची (6th to 10 th standard) परीक्षा पध्दत आणि अभ्यासक्रमामध्ये (change syllabus) आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे त्याच्या दैनंदिन जीवनात येणारे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक ज्ञानाच्या आधारीत शिक्षणाच्या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यासाठी नवी असेसमेंट फ्रेमवर्क पध्दत सीबीएसई अंमलात आणणार आहे.

सध्या शालेय शिक्षण (school education) हे पूर्णपणे पाठ्यपुस्तकांवर आधारित आहे. मात्र पुस्तके बऱ्याचदा वास्तविक जगापेक्षा भिन्न असतात. त्यामुळे विद्यार्थी पाठांतर करून परीक्षेची तयारी करातात. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (natinal education policy) विद्यार्थ्यांची घोकंपट्टी करण्याची सवय घालवण्यासाठी तसेच त्यांना व्यवहारिक ज्ञान आणि भविष्यात येणाऱ्या अडचणींवर उत्तरे शोधता यावीत. यासाठी क्षमता विकसीत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

सीबीएसईच्या अभ्यासक्रमात बदल; असेसमेंट फ्रेमवर्क पध्दत येणार अंमलात
अखंड माणूसकीची शिकवण; मुस्लिम महिलेने केले कोरोना मृत्यावर अंत्यसंस्कार

विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा उद्देश या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आधारित दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वास्तव जगाशी जोडत त्यांचे शिक्षण देण्यात यावे. यामुळे त्यांची समस्या सोडवणे आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढते. या मूल्यांकन फ्रेमवर्कमध्ये विज्ञान, गणित आणि इंग्रजी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी देखील मदत करण्यात आली आहे. जेणेकरून ते मुलांना व्यावहारिक शिक्षणाकडे घेऊन जाऊ शकतात.

विद्यार्थ्यांना दररोजच्या समस्या आणि उदाहरणांद्वारे हे विषय शिकवण्यात येतील. जेणेकरुन विद्यार्थी फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करणार नाहीत. त्याऐवजी त्या शिक्षणाद्वारे आपणास आपले जीवन, समाज आणि देशाच्या व्यावहारिक समस्येवर तोडगा देखील शोधू शकतील. इयत्ता सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या विज्ञान, गणित आणि इंग्रजी या तीन प्रमुख विषयांसाठी नवी असेसमेंट फ्रेमवर्क पध्दत सुरू करण्यात येणार आहे.

सीबीएसईच्या अभ्यासक्रमात बदल; असेसमेंट फ्रेमवर्क पध्दत येणार अंमलात
"मी दिलेले पैसे पचवतेसही आणि.."; श्वेता तिवारीला अभिनवचं प्रत्युत्तर

प्रामुख्याने तीन विषयांच्या शिक्षण आणि मूल्यमापनाच्या पद्धतीत म्हणजेच परीक्षेत बदल होणार असून पुढच्या तीन ते चार वर्षात टप्प्याटप्प्याने हे बदल करण्यात येणार आहेत. केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि चंदिगढच्या केंद्रशासित प्रदेशातल्या शाळांमध्ये नवीन परीक्षा पद्धतींचा अवलंब केला जाणार आहे.

"केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) नवी असेसमेंट फ्रेमवर्क या नवीन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण मिळेल. यामुळे विद्यार्थी आयुष्याच्या स्पर्धेत यशस्वी होतील."

- गीता पाटील, प्राचार्या, सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल, शिरोली पुलाची

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com