esakal | अखंड माणूसकीची शिकवण; मुस्लिम महिलेने केले कोरोना मृत्यावर अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

अखंड माणूसकीची शिकवण; मुस्लिम महिलेने केले कोरोना मृत्यावर अंत्यसंस्कार

अखंड माणूसकीची शिकवण; मुस्लिम महिलेने केले कोरोना मृत्यावर अंत्यसंस्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोना महामारीमध्ये (covid-19) कोरोना योद्ध्यांसाठी काम करत असताना ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी आयेशा (ayesha raut) राऊत यांनी पंचगंगा स्मशानभूमीतील एका मृतदेहावर हिंदू पध्दतीने अंत्यसंस्कार केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेत त्यांनी सर्व विधी पूर्ण केले.

कोरोनाबाधितांसाठी काम करणाऱ्या बैतुलमाल कमिटी, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची आवश्यक साधने देण्यासाठी त्या पंचगंगा स्मशानभूमीत गेल्या होत्या. त्याचवेळी एका रुग्णाचे निधन झाले असून अंत्यसंस्कारासाठी (crimated) त्यांच्या परिवारातील कुणीही उपस्थित नसल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ संबंधितांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्यांनीही परवानगी दिली. महापालिका अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानगी घेऊन त्यांनी सर्व विधी पूर्ण केले.

हेही वाचा: सह्याद्रीच्या जंगलातील वाघोबाचे शेजारी, कोरोनावर भारी!

कोरोना महामारीच्या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे. मी मुस्लीम असले तरी कोणतीही जात-धर्म मानत नाही. सद्यस्थितीत माणुसकी आणि सकारात्मक विचार महत्वाचे असून त्याच उद्देशाने संबंधित मृतदेहावर हिंदू पध्दतीने अंत्यसंस्कार केल्याचे आयेशा राऊत यांनी सांगितले.