
करवीरमध्ये जल्लोष, हातकणंगलेत निराशा; चंदगड भुदरगडमध्ये महिलाराज, गडहिंग्लजमध्येही दिलासा
esakal
Kolhapur Mini Vidhansabha : मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे सर्वाधिक १२ गट असलेल्या करवीरमध्ये सात गट खुले, तीन खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी; तर दोनच गट ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी खुले झाल्याने जल्लोष पाहायला मिळाला. याउलट ११ गट असलेल्या हातकणंगलेतील तब्बल आठ गटांवर विविध प्रवर्गांसाठी; तर खुल्या तीन पैकी दोन गटांवर त्याच प्रवर्गातील महिलेचे आरक्षण पडले आहे. यामुळे काही गट खुले राहतील या आशेवर असलेल्या इच्छुकांत निराशा पाहायला मिळाली.