निकाल तर लागला; समुपदेशन कधी होणार?

विद्यार्थ्यांचा सवाल सीईटी निकाल लागून महिना उलटला
 CET
CET esakal

बेळगाव : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाची असलेल्या सीईटीचा निकाल लागून महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीही अद्याप समुपदेशन प्रक्रिया पार न पडल्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. तसेच समुपदेशनाबाबत अद्याप काहीच हालचाली होत नसल्याने कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

दरवर्षी सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच गुणवत्ता यादीनुसार विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यासाठी काउन्सेलिंग प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे, निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याचा निर्णय घेऊन तयारी करीत असतात. मात्र, ३१ जुलै रोजी सीईटीचा निकाल लागल्यानंतर अद्याप काउन्सेलिंगबाबत कोणत्याच हालचाली करण्यात आलेल्या नाहीत.

कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करण्यात आले होते. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी यंदा सीईटी दिली होती. मात्र, त्यांचा निकाल जाहीर करताना गतवर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल गृहीत धरण्यात आलेला नाही. त्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

त्यामुळे निकाल लागून एक महिना उलटला तरी काउन्सेलिंग झालेले नाही. तसेच काउन्सेलिंगबाबत प्राधिकरणाने अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे, विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.

संभ्रम कायम

चार दिवसांपूर्वी उच्च शिक्षणमंत्र्यांनी १५ सप्टेंबरनंतर काउन्सेलिंग प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती दिली आहे. तरीही संभ्रम कायम आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाली तर अभ्यासक्रमावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सीईटी परीक्षेबाबतचा गोंधळ अद्याप संपलेला नाही. त्यामुळे कौन्सिलिंग कधी होणार याबाबत कर्नाटक परीक्षा प्राधिकरने योग्य ती माहिती देणे गरजेचे आहे. अनेक दिवस झाले तरी अद्याप निर्णय न घेण्यात आल्याने पुढील अभ्यासक्रमात प्रवेश घेताना अडचण निर्माण होत आहे.

- स्नेहित कामतगेकर, विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com