कोल्हापूर : चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्या अमित चंद्रकांत हत्तीकोटे (वय ३४, रा. साने गुरुजी वसाहत) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातून काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून सुटला होता. यानंतर त्याने पुन्हा शहरात दुचाकी चोरींचा सपाटा लावला होता.