चंदगड: हे इंग्रजांच्या काळापासून प्रशासकीय ठिकाण. त्या काळात बांधलेल्या इमारती आजही आपल्या वेगळ्या अस्तित्वाकडे लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगलाने व्यापलेल्या कोकण सीमेवरील या गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. .तालुक्याच्या पश्चिमेला एका कोपऱ्यात वसलेल्या या गावाला स्वातंत्र्यानंतरही तालुक्याचे ठिकाण म्हणूनही मान्यता मिळाली. मात्र, भौगोलिक उंच-सखलपणा, त्यातूनच सोयीस्करपणे बांधलेली घरे. मुख्य बाजारपेठ वगळता सर्वच गल्ल्या अत्यंत निमुळत्या आहेत. वाढत्या वाहनसंख्येमुळे बाजारपेठेचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. .Kolhapur News: मुरगूडमध्ये सांडपाणी थेट वेदगंगेत; २४×७ नळपाणी योजना कोलमडली, नागरिक त्रस्त! .अंतर्गत गल्ल्यांचे रुंदीकरणही महत्त्वाचे आहे. खासगी वाहनांची संख्या वाढत असताना येणाऱ्या समोरून दोन वाहनांना बाजू देता येत नाही. एका बाजूला गावचे रूपडे शहरात रूपांतरित होत असताना नागरिकांची मने ही व्यापक व्हायला हवीत. प्रत्येकाने आपल्या मालकीतील दीड-दोन फूट जागा दिली, तर गल्लींचे विस्तारीकरण शक्य आहे. सांडपाण्यासह कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. - सुनील कोंडुसकर.पाच वर्षांपूर्वी शेजारच्या आजरा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आणि चंदगड ग्रामस्थांनीही उचल खाल्ली. नगरपंचायतीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय चळवळ उभी राहिली. अनेकदा आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. गाव बंदचा नारा यशस्वी झाला. काहींनी विविध प्रकारच्या शपथा घेतल्या. नगरपंचायत होत नाही, तोपर्यंत अनवाणी चालण्याचा पण पाळला. .Kolhapur News: हुपरीतील ‘चंदेरी नगरी’चा तेज हरपला; पाणीपुरवठा, अतिक्रमणे आणि निकृष्ट कामांमुळे नागरिक त्रस्त!.या सर्वांमागे गावचा विकास हाच महत्त्वाचा मुद्दा होता. तालुक्याचे गाव असले, तरी ग्रामीण मुखवटा असल्याने त्याला शहराचे स्वरूप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज होती. त्यासाठी नंगरपंचायत होणे गरजेचे होते. लोकलढ्याला यश येऊन येथे नगरपंचायतीला मंजुरी मिळाली. पाच वर्षांत गटर्स, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आदी पायाभूत कामेही झाली. मात्र, सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. .दररोज लाखो लिटर सांडपाणी प्रक्रियेविना थेट ताम्रपर्णी नदीत मिसळत आहे. कचऱ्याचा उठाव वेळेवर होत नाही. प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न आरोग्यावर परिणाम करणारा ठरत आहे. शहराबाहेर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला आग लावल्यानंतर त्याचा धूर शेजारच्या वसाहतीतून पसरत आहे. गुरुवार पेठ, कुंभार गल्ली, ब्राह्मण गल्ली, रवळनाथ गल्ली, शिवाजी गल्ली, आझाद गल्ली, रामदेव गल्ली, आंबेडकरनगर आदी वसाहती हे मूळचे चंदगड. त्यानंतर लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने काही प्रमाणात विस्तारीकरण झाले. .पुढे नोकरी, व्यवसायानिमित्त परगावातून येथे आलेल्या नागरिकांची स्वतःच्या घरासाठी जागेची मागणी वाढू लागली. त्यातून नवीन वसाहत, साईनगर, उल्हासनगर, ब्रह्मदेवनगर, शिक्षक कॉलनी, विनायकनगर, देसाईवाडी या वसाहती विस्तारल्या. त्याचबरोबर नागरी सुविधा देण्याची जबाबदारीही वाढली. रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या पायाभूत सुविधा पुरविण्यात अजूनही पूर्वी ग्रामपंचायत आणि आता नगरपंचायत प्रशासन अपुरे पडत आहे..शहरासाठी घटप्रभा प्रकल्पावर आधारित नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. बारमाही मुलबक पाणी असताना तांत्रिक अडचणीमुळे वितरणात दोष आहेत. मूळ शहराची रचनाच विचित्र असल्यामुळे मध्यवर्ती विरंगुळ्याचे ठिकाण, बगीचा, व्यायामशाळा यासारखे उपक्रम राबविण्यात जागेची अडचण आहे. बाबा गार्डनच्या व्यवस्थापनेकडे दुर्लक्ष आहे. प्रशासनाकडून एकही व्यायामशाळा उघडण्यात आलेली नाही. क्रीडांगणाचे काम सुमारे १५ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे..पाच वर्षांपूर्वी शेजारच्या आजरा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आणि चंदगड ग्रामस्थांनीही उचल खाल्ली. नगरपंचायतीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय चळवळ उभी राहिली. अनेकदा आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. गाव बंदचा नारा यशस्वी झाला. काहींनी विविध प्रकारच्या शपथा घेतल्या. नगरपंचायत होत नाही, तोपर्यंत अनवाणी चालण्याचा पण पाळला. या सर्वांमागे गावचा विकास हाच महत्त्वाचा मुद्दा होता. तालुक्याचे गाव असले, तरी ग्रामीण मुखवटा असल्याने त्याला शहराचे स्वरूप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज होती. .त्यासाठी नंगरपंचायत होणे गरजेचे होते. लोकलढ्याला यश येऊन येथे नगरपंचायतीला मंजुरी मिळाली. पाच वर्षांत गटर्स, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आदी पायाभूत कामेही झाली. मात्र, सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दररोज लाखो लिटर सांडपाणी प्रक्रियेविना थेट ताम्रपर्णी नदीत मिसळत आहे. कचऱ्याचा उठाव वेळेवर होत नाही. प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न आरोग्यावर परिणाम करणारा ठरत आहे. शहराबाहेर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला आग लावल्यानंतर त्याचा धूर शेजारच्या वसाहतीतून पसरत आहे..गुरुवार पेठ, कुंभार गल्ली, ब्राह्मण गल्ली, रवळनाथ गल्ली, शिवाजी गल्ली, आझाद गल्ली, रामदेव गल्ली, आंबेडकरनगर आदी वसाहती हे मूळचे चंदगड. त्यानंतर लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने काही प्रमाणात विस्तारीकरण झाले. पुढे नोकरी, व्यवसायानिमित्त परगावातून येथे आलेल्या नागरिकांची स्वतःच्या घरासाठी जागेची मागणी वाढू लागली. त्यातून नवीन वसाहत, .साईनगर, उल्हासनगर, ब्रह्मदेवनगर, शिक्षक कॉलनी, विनायकनगर, देसाईवाडी या वसाहती विस्तारल्या. त्याचबरोबर नागरी सुविधा देण्याची जबाबदारीही वाढली. रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या पायाभूत सुविधा पुरविण्यात अजूनही पूर्वी ग्रामपंचायत आणि आता नगरपंचायत प्रशासन अपुरे पडत आहे. शहरासाठी घटप्रभा प्रकल्पावर आधारित नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. बारमाही मुलबक पाणी असताना तांत्रिक अडचणीमुळे वितरणात दोष आहेत..मूळ शहराची रचनाच विचित्र असल्यामुळे मध्यवर्ती विरंगुळ्याचे ठिकाण, बगीचा, व्यायामशाळा यासारखे उपक्रम राबविण्यात जागेची अडचण आहे. बाबा गार्डनच्या व्यवस्थापनेकडे दुर्लक्ष आहे. प्रशासनाकडून एकही व्यायामशाळा उघडण्यात आलेली नाही. क्रीडांगणाचे काम सुमारे १५ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे..चंदगड शहराला खेळाची परंपरा आहे. उदयोन्मुख खेळाडू तयार होण्यासाठी क्रीडांगण गरजेचे आहे. सद्य:स्थितीत तरुणांना शेतवडीतून सराव करावा लागतो. त्यासाठी सुगी उरकण्याची वाट पाहावी लागते. सुमारे पाच, सहा महिन्यांचा मोठा वेळ वाया जातो. त्यासाठी शासनाने प्रत्येक तालुक्याला क्रीडांगण दिले असून, इथेही त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्याला चालना देऊन ते पूर्णत्वाला नेल्यास खेळाडूंची सोय होईल.- विवेक सबनीस, नागरिक.शहरालगत टाकलेला कचरा नजीकच्या वसाहतींसाठी त्रासदायक ठरत आहे. कचऱ्याला आग लावल्यामुळे वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर हा धूर वसाहतीत पसरतो. दिवसभर परिसर धुराने व्यापून राहतो. आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी नगरपंचायतीने प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावा.- विजय पाटील, नागरिक.वीज पंप जळाला, पाईप फुटले, व्हॉल्व्हला गळती लागली या कारणाने सलग दोन-तीन दिवस पाणीपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे महिला वर्गाचे मोठे हाल होतात. तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी नगरपंचायतीने स्वतंत्र यंत्रणा राबवून देखरेख ठेवायला हवी. प्रत्येक विभागाला वेळेत पाणीपुरवठा होतो का, यावर नियंत्रण ठेवायला हवे.- नम्रता पाटील, गृहिणी.प्रश्नबाजारपेठेसह अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, नळ पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कचरा प्रक्रिया प्रकल्प, क्रीडांगण सद्यःस्थितीबाजारपेठ रुंदीकरणास स्थानिकांचाच विरोध, तांत्रिक अडचणीमुळे पाणी वितरणात दोष, प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट नदीत, कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे, क्रीडांगणाचे काम अर्धवट अवस्थेत बंद.उपाययोजनास्थानिकांना रुंदीकरणाचे महत्त्व समजून द्यायला हवे,तांत्रिक अडचणी वेळीच दूर करून पाणी वितरणात सुसूत्रता आणायला हवी, सांडपाण्यावर प्रक्रिया गरजेची, कचऱ्याला आग न लावता शास्त्रीय विघटन पद्धतीचा अवलंब हवा, क्रीडांगणाच्या थांबलेल्या कामाला गती द्यायला हवी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.