Rajarshi Shahu Aghadi: चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट यांनी एकत्र येत ‘राजर्षी शाहू आघाडी’च्या माध्यमातून भाजपविरोधात भक्कम मोर्चा उभारला आहे.
चंदगड: येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व उपमुख्यमंत्री अजित पवार गटाची दोन दिवसांपूर्वी गडहिंग्लज येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आघाडी जाहीर झाली.