Kolhapuresakal
कोल्हापूर
Kolhapur : आमदार शिवाजी पाटील यांची आश्चर्यकारक मागणी, शक्तिपीठ महामार्गासाठी चंदगड तालुक्यातील सुचविले चार मार्ग...
Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गामध्ये चंदगड विभागाचा समावेश करावा, अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी आज रस्ते विकास महामंडळाकडे केली. त्यांनी चार मार्ग सुचविलेले आहेत.
Shaktipeeth Highway Chandgad : शक्तिपीठ महामार्गामध्ये चंदगड विभागाचा समावेश करावा, अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी आज रस्ते विकास महामंडळाकडे केली. त्यांनी चार मार्ग सुचविलेले आहेत. त्यांनी मुंबई येथे रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची भेट घेऊन या मार्गाचा चंदगड मतदारसंघातील जनतेला कसा लाभ होणार याची ‘पीपीटी’द्वारे माहिती दिली. जिल्ह्यातून या मार्गाला विरोध होत असताना आमदार पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.