''अशोक चव्हाण वेड पांघरुण पेडगावला जाऊ नका'; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

''अशोक चव्हाण वेड पांघरुण पेडगावला जाऊ नका'; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

कोल्हापूर: ‘‘महाविकास आघाडी (Mahavikas aaghadi) सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक (Ashok Chavan)चव्हाण वारंवार १०२ व्या घटनादुरुस्तीचा उल्लेख करतात. मात्र, त्यांना एक तर कायदा कळत नाही किंवा ते समाजाची दिशाभूल करण्यासाठी वेड पांघरुण पेडगावला जात आहेत,’’ अशी टीका आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil)यांनी येथे केली. चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केल्यावर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

chandrakant patil criticism on ashok chavan kolhapur political marathi news

ते म्हणाले, ‘‘चव्हाण यांनी आज पुन्हा १०२ व्या घटना दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला. या घटना दुरुस्तीनंतरही राज्याचे एखाद्या जातीला मागास ठरविण्याचे व आरक्षण देण्याचे अधिकार अबाधित आहेत. त्यानुसारच उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाला. सर्वोच्च न्यायालयातही घटना दुरुस्तीबाबत सर्वांगीण चर्चा झाली. मात्र, त्यांना कायदा कळत नाही. सातशे पानी निकालही नीट समजत नाही आणि हे समजायला महाराष्ट्राची जनता काही दुधखुळी नाही. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी कमी पडले. मात्र, ते मान्य न करता केवळ केंद्राकडे चेंडू टोलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘यापूर्वी कित्येक वर्षे राज्य आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. सहा आयोग नेमले गेले आणि त्यांनी मराठा समाज पुढारलेला असल्याचा अहवाल दिला. त्यावेळी मग हे अहवाल फेटाळून आरक्षणासाठी का प्रयत्न केले नाहीत? मुळात राज्यात मागास आयोगच नाही. तो अगोदर निमार्ण करणे गरजेचे आहे; मात्र, योग्य पध्दतीने निर्णय न घेता केवळ केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली जात आहे. आरक्षणाबाबतच्या निकालानंतर मराठा समाज गप्प राहणार नाही. मात्र, कोरोनाचे कारण पुढे करून शांततेचे आवाहन केले जात आहे.’’

chandrakant patil criticism on ashok chavan kolhapur political marathi news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com