esakal | 'मराठा समाजाला उल्लू बनवू नका' चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

'मराठा समाजाला उल्लू बनवू नका' चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

'मराठा समाजाला उल्लू बनवू नका' चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी (maratha reservation) राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणे हा हास्यास्पद प्रकार आहे. कारण आता मराठा आरक्षणाबाबत जे काही करायचे आहे ते राज्य सरकारने (state government) करायचे आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला उल्लू बनवणे थांबवावे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव (CM uddhav thakrey) ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी राज्यपालांना निवेदन दिले. यावर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले, ‘ज्या राज्यपालांना इतके दिवस शिव्या घातल्या, आज त्यांनाच नम्रपणे जाऊन भेटण्याची राज्य सरकारमधील मंत्र्यांवर वेळ आली. मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपालांना (governer) निवेदन देणे व ते राष्ट्रपतींना पाठवा, असे सांगणे हास्यास्पद आहे. मागास आयोग नेमणे, मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करणे, आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारून तो केंद्रीय मागास आयोगाला पाठवणे, तेथून तो राष्ट्रपतींकडे जाईल. त्यानंतर राष्ट्रपती राज्य सरकारला आरक्षणाचा कायदा करायला सांगतील. कारण राज्यातील एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्यालाच आहे. महाविकास आघाडीचे सरकार मराठा आरक्षणावरून जनतेची दिशाभूल करत आहे. मराठा समाजाला उल्लू बनवण्याचे काम करू नये.’

हेही वाचा: 'गाढवांनो, मूर्खांनो..'; ट्रोलर्सना सुनावताना ढासळला सोनू निगमचा तोल