नव्या वर्षात आघाडी सरकार जाऊन 'भाजपा'ची सत्ता येईल; चंद्रकांत पाटलांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

"नव्या वर्षात आघाडी सरकार जाऊन 'भाजप'ची सत्ता येईल"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकार आता काहीच दिवसांचे राहिले आहे. येणाऱ्या नव्या वर्षात राज्यात सत्ताबदल होईल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. कोल्हापूर विधानपरिषद भाजप उमेदवार अमोल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

हेही वाचा: कोनशिलेवर लिहलं होतं हसन 'मुस्त्रीफ'; अजितदादांनी लावला कपाळाला हात

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, 'विधानपरिषदेच्या निवडणुकीत अमल महाडिक मोठ्या फरकाने निवडून येतील. कारण जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप लोकप्रतिनिधींची संख्या अधिक आहे. याशिवाय जे अपक्ष लोकप्रतिनिधी असलेलेही भाजप बरोबर येतील. कारण ज्यांना राजकीय भविष्य जाणता येते त्यांना महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही याची कल्पना आहे. येणाऱ्या नवीन वर्षात काही दिवसातच महाविकास आघाडी सरकार राज्यातून जाईल. त्यानंतर देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत असेल. ही बाब लक्षात घेऊनच अपक्ष उमेदवार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे विजयाची मॅजिक फिगर आम्ही पार करूच पण अमोल महाडिक मोठ्या फरकाने निवडून येतील, असेही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा: राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून येणार?

loading image
go to top