गौरव डोंगरे
खून, मारामारी, घरफोडी, महिलांविषयी अत्याचाराच्या घटनांत दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात चढउतार दिसतो. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये गंभीर गुन्ह्यात घट झाल्याचे दिसते; पण जिल्ह्यातील गुन्हेगारीचा ‘पॅटर्न’ बदलताना दिसतो. बालगुन्हेगारीने समाजाची चिंता वाढवली असून पिस्तूल, एडका, कोयत्यासह सुरू असलेला संघर्ष जीवघेणा ठरू लागला आहे. वाढत्या बेरोजगारीने अमली पदार्थ तस्करी, दुचाकी चोरींच्या घटनांत भरच पडत आहे. बदलत्या कोल्हापूरच्या गुन्हेगारी पॅटर्नवर प्रकाशझोत.