

fadnavis-rally-bjp-workers-clash-police-rahul-awade
esakal
Devendra Fadnavis Rally Ichalkaranji : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य ‘विजयी संकल्प रॅली’दरम्यान भाग्यरेखा टॉकीज परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. रॅली या ठिकाणी पोहोचताच मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट भेटण्यासाठी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते बंदोबस्त तोडून पुढे सरसावले. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न करताच वादाला तोंड फुटले आणि पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. रॅलीसाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.