४५ मिनिटांत त्याने बनविले चक्क १०४ प्रकारचे चाट....

Chef Digvijay Bhosale claims the record was recorded in India Book
Chef Digvijay Bhosale claims the record was recorded in India Book
Updated on

कोल्हापूर - देशातील विविध राज्यांतील १०४ प्रकारचे चाट ४५ मिनिटांत बनविण्याचा विक्रम आज येथे झाला. प्रसिद्ध शेफ दिग्विजय भोसले यांनी या विक्रमाची नोंद इंडिया बुकमध्ये झाल्याचा दावा केला आहे. कॉन्टिनंटल इस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी आंबेवाडी येथील गुरूकृपा हॉलमध्ये हा विक्रम केला. या विक्रमाची नोंद इंडिया बुकमध्ये झाली.

 सायंकाळी पाच वाजता पदार्थ बनविण्यास सुरवात झाली. पावणे सहाला हा विक्रम पूर्ण झाला. सव्वा सहा वाजता विक्रम नोंद झाल्याची घोषणा करण्यात आली. ३७ विद्यार्थ्यांनी या विक्रमात सहभाग नोंदवला. आलू टिक्की चाट, रॉ बनाना चाट, मिक्‍स स्प्रॉवट चाट, ब्रेड चाट, शाहु भेळ, लेन्टील चाट, थ्री बिन्स चाट, ओटस्‌ भेल, क्रिस्पी ब्रेड भेळ, दही वडा, छोले चाट, कटोरी चाट, समोसा चाट, फ्रुट चाट, मसुर चाट, ब्रोकोली चाट, कॉलिफ्लॉवर चाट, आलु ॲण्ड ग्रीन पिस चाट, मशरूम टिक्की चाट, चीझ पुरी, गीता बबिता, राम लखन, क्रिस्पी सिगार रोल्स हे पदार्थ विशेष आकर्षण राहिले. पवन सोळंकी यांनी परीक्षण केले. अश्‍विनी भोसले, नेहा कांबळे आदी 
उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com